काश्मीर भारतात कसं विलीन झालं?
भारताची फाळणी झाली तेव्हा काश्मीरला स्वतंत्र राहायचं होतं. म्हणून जम्मू-काश्मीर संस्थानाने बघ्याची भूमिका घेतली होती. पण त्यानंतर असं काय झालं की काश्मीरला भारतात विलीन व्हावं लागलं? बीबीसीच्या आमीर पीरजादा यांनी काश्मीरमध्ये जाऊन त्या काळातली काही तथ्यं जाणून घेतली. ऑक्टोबर 1947 मध्ये मोहम्मद सुलतान ठाकेर 15 वर्षांचे होते. ते उरीमधल्या मोहुरा जलविद्युत प्रकल्पामध्ये काम करायचे. जम्मू काश्मीरमधला हा एकमेव जलविद्युत प्रकल्प होता. इथूनच श्रीनगरला वीज पुरवली जायची. त्यांना आठवतं, पाकिस्तानमधून पश्तून टोळ्यांनी आक्रमण केलं. ते त्यांना उर्दूमध्ये 'कबाली' म्हणतात. जुन्या जलविद्युत प्रकल्पाच्या अवशेषांमध्ये बसलेले मोहम्मद सुलतान ठाकेर सांगतात, "महाराजा हरी सिंग यांच्या सैन्याने उरीमधून माघार घेतली आणि ते मोहुराला पोहोचले." "त्यांनी इथल्या टोळ्यांशी लढाई केली, आणि बंकर बांधले. कबाली जंगलातून यायचे. या टोळ्यांनी गोळीबार केला आणि महाराजांचं सैन्य पळून गेलं." मोहम्मद सुलतान ठाकेर म्हणतात की काबाली लुटारू होते. ते सांगतात, "आम्ही घाबरलो होतो. आम्हाला कोणीही मारून...