STOCK EXCHANGE
भागबाजार (stock exchange)हा भांडवलबाजाराचा महत्वाचा घटक असून तेथे समभाग (Shares) ,कर्जरोखे (Debentures) ,सरकारी /खासगी रोखे (Bonds) ,परस्पर निधी (Mutual fund units) , समभाग निधी (ETF) ,विविध देशांची विनिमय चलने (Forex) , वस्तू बाजारातील वस्तू (Commodity) जसे सोने ,चांदी ,खनिज तेल ई .यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात .भागबाजारतून कृषी /सेवा क्षेत्र /उद्योग /सरकार यांना मध्यम आणि दीर्घ मुदतिचे भांडवल उपलब्ध होते .अशाप्रकारे भांडवल उभारणी ही विविध नियमांचे पालन करून केवळ नोंदणीकृत कंपन्यांना करता येते .याचप्रमाणे या बाजारात उपलब्ध बहुविध गुंतवणूक पर्यायामुळे व्यक्ति , बँका ,विमा कंपन्या ,निवृती वेतन योजना राबवणाऱ्या कंपन्या , परकीय गुंतवणूकदार यांना अतिरिक्त रक्कम जोखिम पत्करून किफायतशीरपणे गुंतवण्याची संधी प्राप्त झाली आहे . यापैकी वस्तू बाजारातील वस्तूचे व्यवहार प्रामुख्याने मल्टि कमोडीटी एक्सचेंजवर तर इतर सर्व व्यवहार प्रामुख्याने राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात होतात आणि ते कुठूनही करता येतात .या सर्व व्यवहारावर सेबी या स्वतंत्र नियामकाचे नियंत्रण आहे आणि हे व्यवह...